Loksevak AI · मराठी विद्यार्थ्यांसाठी, मराठीत

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी,
त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच गतीने शिकवणारे हक्काचे ॲप!

Loksevak AI ची निर्मिती महाराष्ट्रातील एका ध्येयवेड्या टीमने केली आहे. आमच्या आजूबाजूला मराठी माध्यमातून अहोरात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मित्र, भावंडे आणि शेजारी आहेत; त्यांच्या अभ्यासातील प्रत्यक्ष अडचणी आम्ही रोज जवळून अनुभवल्या आहेत.

आज पुस्तके आणि लेक्चर्स सर्वांकडेच उपलब्ध आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्याची आकलनक्षमता, गती आणि अभ्यासपद्धती वेगळी असताना सर्वांना एकच साचेबद्ध Study Plan कसा चालेल? आपण अभ्यासात नेमके कुठे कमी पडतोय हे सांगणारे कोणी नाही, प्रश्न नेमका का चुकला हे समजावणारे कोणी नाही, आणि तालुक्यात बसून अभ्यास करताना राज्यभरातील स्पर्धेत आपण नेमके कुठे आहोत हे थेट परीक्षेच्या दिवशीच कळते.

हीच उणीव भरून काढण्यासाठी आम्ही Loksevak AI तयार केले. इथे प्रत्येक सुविधा मूळ मराठीतूनच घडवलेली आहे: पहिल्या दिवशी क्षमता चाचणी, त्यानुसार प्रत्येकाचा स्वतंत्र Study Plan, प्रत्येक चुकीचे सखोल विश्लेषण, विसरण्यापूर्वी स्मार्ट उजळणी, दर रविवारी राज्यव्यापी Live Test द्वारे तालुका स्तरापर्यंतची Rank आणि Super Pack मध्ये यशस्वी MPSC अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन. हे कोणत्याही कोचिंग क्लासचे ॲप नाही आणि इथे कोणताही कोर्स विकला जात नाही. सध्या आमचे संपूर्ण लक्ष MPSC गट-क २०२६ वर आहे; राज्यसेवा, गट-ब आणि इतर परीक्षांची तयारीही लवकरच याच ॲपमध्ये येत आहे.

आमची चार तत्त्वे

मूळ मराठीतून निर्मितीइंग्रजीतून यांत्रिक भाषांतर नाही; प्रत्येक संकल्पना मूळ मराठीतच मांडलेली आहे, आवश्यक तिथे महत्त्वाच्या इंग्रजी संज्ञांसह. English आवृत्तीही उपलब्ध आहे.
पारदर्शक आणि अचूक निकालनिव्वळ गुण तुमच्या परीक्षेच्या नियमानुसारच मोजले जातात: गट-क साठी १/४ निगेटिव्ह मार्किंग आणि पाचव्या पर्यायाचा नियम. अंदाज हा "अंदाज" म्हणूनच दाखवला जातो; कोणतीही फुगवलेली आकडेवारी दिली जात नाही.
तुमच्या डेटाची गोपनीयतातुमचा वैयक्तिक डेटा जाहिरातींसाठी कधीही वापरला किंवा विकला जात नाही. डेटा Export करण्याची आणि अकाउंट Delete करण्याची सोय ॲपमध्येच उपलब्ध आहे.
तणावमुक्त अभ्याससातत्यासाठी Daily Streak आहे, पण नोटिफिकेशन्सचा भडिमार नाही. दिवसाचा नेमलेला अभ्यास पूर्ण झाला की ॲप स्वतःहून थांबायला सांगते.

आमची टीम

सॉफ्टवेअर, डिझाइन आणि मराठी मजकूर, सर्व काही आमच्याच टीमकडून तयार होते. Super Pack मधील ऑफलाइन सत्रांत MPSC उत्तीर्ण अधिकारी आणि विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

स्पष्ट शब्दांत

Loksevak AI हे एक खाजगी शैक्षणिक ॲप आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), महाराष्ट्र शासन किंवा कोणत्याही भरती मंडळाशी याचा अधिकृत संबंध नाही. ॲपमधील कोणतेही चिन्ह, नाव किंवा मजकूर शासकीय असल्याचा दावा करत नाही. परीक्षेचा अर्ज फक्त आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरच करावा.

संपर्क

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, तसेच माध्यमे आणि शैक्षणिक भागीदारीसाठी (Media & Partnerships) आमचा ईमेल आणि WhatsApp क्रमांक मदत केंद्रावर उपलब्ध आहे. मदत केंद्रावर जा →